बेळगाव शहरातील भू अभिलेख कार्यालयात सोमवारी दुपारच्या सुमारास चोरीची घटना घडली असून या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या पर्समधून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास बेळगाव शहरातील भू अभिलेख कार्यालयात एका चोराने महिलेच्या टेबलवर ठेवलेली पर्स चोरून यामधील मौल्यवान ऐवज लुटला आहे. सामान्य नागरिकांच्या वेशात आलेल्या सदर व्यक्तीने महिला कर्मचारी कामात व्यस्त असल्याचे हेरून पर्सवर डल्ला मारत तेथून पळ काढला. सदर पर्समध्ये २ ग्राम सोने, काही रोख रक्कम यासह आवश्यक कागदपत्रे होती. चोरी करून झाल्यावर महत्वाची कागदपत्रे चोराने शिताफीने उपनोंदणी कार्यालयाच्या जवळ असणाऱ्या पोस्ट बॉक्समध्ये टाकली असून हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खडे बाजार पोलिस स्थानक हद्दीत सदर घटनेची नोंद झाली आहे.



Recent Comments