Belagavi

संक्रांती निमित्य कैवल्यम फाउंडेशन येथे हळदी कुंकू कार्यक्रम

Share

क्रांती मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांती निमित्य कैवल्यम् फाऊंडेशन येथे हळदी कुंकू कार्यक्रम अर्थपूर्णपणे साजरा करण्यात आला.

कैवल्यम फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. प्रशांत आणि डॉ. पवित्रा यांनी दीपप्रज्वलन आणि भारतमातेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
निसर्गाच्या कुशीत, मंडळाच्या सर्व महिलांनी उत्साहाने निळ्या साड्या नेसून, निसर्ग मातेची पूजा केली, सुगीची गाणी गायली आणि एकमेकांना तीळ गुळ वाटून उत्सव साजरा केला. कार्यक्रमात टिपरी व विविध पारंपारिक सांस्कृतिक उपक्रम आणि पतंग उडवणे, रस्सीखेच असे खेळ खेळले गेले. सर्व महिलांनी 108 राम नामाचा जप केला. यानंतर सर्वांनी सहभोजन केला.

मंडळ अध्यक्ष मंगल मठद स्वागत सचिव भारती रत्नाप्पागोळ यांनी प्रास्ताविक केले. गीता रत्नश्री, अनिता ,शोभा, ममता सर्वांनी सुंदर स्वागत गीत गायले त्रिशुला पिपेनवर यांनी सत्कार केला. आशा निलजगी, रेणुका कांबळे, राजेंद्र मठ, अजित मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Tags: