Belagavi

मानस कराटे स्पोर्ट्स अकादमीचा वार्षिक बल्क बेल्ट प्रदान कार्यक्रम

Share

मानस कराटे स्पोर्ट्स अकादमीचा वार्षिक बल्क बेल्ट प्रदान कार्यक्रम पार पडला .  रविवारी , बेकीनकेरे येथील , लक्ष्मी गल्ली येथील लक्ष्मी मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात स्फूर्ती गीताने झाली .

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी , कर्नाटक दलित संघर्ष समिती तसेच भीमवाद चे जिल्हा उपाध्यक्ष शंकर दशरथ कांबळे हे होते .

प्रमुख पाहुणे म्हणून , गंगुबाई गावडे , बळवंत भोगन , भावकु सावंत . रामा कुमरीकर , ग्राम पंचायतचे आजी माजी सदस्य , प्रमुख व्यक्ती, आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनें उपस्थित होते .

कार्यक्रमादरम्यान कराटेपटूंनी विविध सांस्कृतिक कार्यकम आणि प्रात्यक्षिके सादर केली . बीएसएफ मध्ये निवड झालेल्या रोशनी मुळीक हीचा तसेच ब्लॅकबेल्ट मिळवलेल्या कराटेपटूंचा सत्कार करण्यात आला .

यावेळी सेन्सई भरमानी पाटील यांचा सत्कार करण्यात आला .

Tags: