Vijayapura

हिटनल्ली येथे होणाऱ्या कृषी मेळाव्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना टोलशुल्क आकारू नका

Share

विजयपूर शहरात हिटनल्ली येथे होणाऱ्या कृषी मेळाव्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना टोल न आकारण्याचे निवेदन , आज अहिंद रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना सोमनाथ काखीमणी म्हणाले की, या महिन्याच्या 11.12 आणि 13 तारखेला कृषी विद्यापीठ, हिटनल्ली येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला असून यामध्ये अनेक शेतकरी, विद्यार्थी व शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत . हिटनल्ली येथे होणाऱ्या कृषी मेळाव्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना टोलशुल्क आकारू नका असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले .

Tags: