रोटरी क्लब बेळगाव आणि बॉडीबिल्डिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 16 वी राष्ट्रीय पुरुष व महिला शरीरसौष्ठव स्पर्धा 14 ते 16 जानेवारी दरम्यान बेळगावच्या अन्नोत्सव येथे होणार असल्याची माहिती रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष अविनाश पोतादार यांनी दिली.
याबाबत आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, देशभरातून 400 हून अधिक पुरुष आणि 40 ते 50 महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत. विविध समित्या गठीत करून त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या स्पर्धेसाठी बेळगावातील अनेक मान्यवर सहकार्य करत आहेत.मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रथम पारितोषिक रोख 30 लाखांचे प्रायोजकत्व दिले आहे. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाईल.
राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज निर्णायक भूमिका बजावतील. लष्करासह विविध विभागातील 200 हून अधिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.पदक विजेत्या स्पर्धकांची भरतीसाठी निवड केली जाईल. स्पर्धकांची नोंदणी १४ जानेवारीला होणार असून १५ जानेवारीला सकाळी ९ वाजल्यापासून स्पर्धा सुरू होतील. प्रवेश विनामूल्य आहे. त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
इव्हेंटचे ॲम्बेसेडर मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांनी बेळगावातील स्त्री-पुरुषांना शरीर सौष्ठव आणि शारीरिक आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना योग्य भोजन, वसती व इतर सुविधा पुरविल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आयोजक अजित सिद्धन्नवर यांनीही बक्षिसांची माहिती दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत , सुहास चांडक, डॉ.मनिष हेरेकर, गंगाधर के, हेमंत हावळ आदी उपस्थित होते.


Recent Comments