गाडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, शहापूर, बेळगाव येथे श्री दुर्गादेवी व श्री मातंगी देवीची यात्रा मोठ्या भक्तिभावाने पार पडली.

गाडे मार्ग, सिद्धार्थ कॉलनी, शहापूर, बेळगाव येथे श्री दुर्गादेवी आणि श्री मातंगी देवीचा यात्रोत्सव सुरू आहे. मंगळवारी श्रीदेवीची ओठी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. शेकडो महिलांनी श्रीदेवीची ओठी भरून देवीचे दर्शन घेतले. यावेळी झालेल्या महाआरतीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. देवीच्या यात्रोत्सवाचा एक भाग म्हणून भजन कीर्तनासारखे कार्यक्रम आयोजिण्यात आले होते.

या कार्यक्रमात सहभागी होऊन श्री रामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर यांनी देवीचे दर्शन घेतले व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या.बेळगावातील सर्व जनतेवर देवीची कृपा होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आज, बुधवारी मध्यान्ह महाप्रसाद होणार आहे.


Recent Comments