Belagavi

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

Share

हुबळी येथील एम्पायर शोतोकन राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

हुबळी येथील एम्पायर शोतोकन राष्ट्रीय कराटे स्पर्धेत एकूण 1200 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटे, बेळगावची विद्यार्थिनी निधी वेर्णेकर हिने 8 वर्षांच्या गटात चार फेऱ्या जिंकून ट्रॉफी पटकावली. 10 वर्षे गटात शांती निकेतन शाळेतील दीप्ती करमळकर, स्वरा गावडे, विघ्नेश बाबीचे, अखिलेश पाटील आणि आनंद यांनी तर 14 वर्षांच्या गटात निवेदन पाटील, सुकीत गलगली, गगन जक्कनवर, जान्हवी आणि परिणीती फाटक यांनी पाचही फेऱ्या जिंकून कटाज आणि फाईटमध्ये बाजी मारली. .

रिया वेर्णेकर हिने ब्लॅक बेल्ट प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वेळी सिनियर मास्टर मधु पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: