Vijayapura

विजयपूर शहरात साईबाबा मूर्तीची प्रतिष्ठापना :२ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

Share

महाराष्ट्र राज्यातील शिरडीमध्ये साईबाबांचे भव्य मंदीर आहे आणि कर्नाटकमधील अनेक भक्त शिरडीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतात. अशाप्रकारे, शिरडीला जाऊ न शकणार्या भक्तांसाठी विजयपूर शहरात एक भव्य मंदीर बांधण्यात आले आहे. दोन दिवस मोठ्या आनंदात आणि श्रद्धेने साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडला आहे

ऐतिहासिक विजयपूर शहरात नवीन वर्षाच्या आनंदात आणखी एक आनंदाची भर पडली आहे . दोन दिवसांच्या रंगारंग कार्यक्रमात आणि सांस्कृतिक व पारंपारिक मिरवणुकीने साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना पार पडली. शहरातील अथणी रोडवरील महात्मा गांधी नगरमध्ये आकर्षक मंदीर तयार करण्यात आले आहे. ४.५ फूट उंच , संगमरवरी दगडात कोरलेल्या सुंदर साईबाबा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

नवीन वर्षाच्या दिवशी दोन दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांद्वारे प्रतिष्ठापना केली गेली. शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर भव्य मिरवणुकीत साईबाबा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुकीत पंढरपूर वारकरी परंपरेचे नृत्य आणि कलश घेऊन चाललेल्या सुवासिनींनी प्रमुख आकर्षण ठरल्या . त्याचबरोबर ढोलताशा , धनगरी ढोल पारंपारिक नृत्य आणि डीजेने उपस्थितांची मने जिंकली.

दोन दिवस चाललेल्या भव्य कार्यक्रमात विजयपूर जिल्ह्यातील मंगळी हिरेमठाचे अभिनव संगरबसव स्वामीजी, बीदरच्या चालकापूर मठाचे शंकरानंद स्वामीजी उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक प्रमुख व्यक्ती, जनप्रतिनिधी उपस्थित होते आणि साईबाबांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. यावेळी जवळपास दोन हजार सुवासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पंधरा हजारांपेक्षा अधिक भक्त सहभागी झाले आणि कृतार्थ झाले. उपस्थित भक्तांना दोन दिवस अन्नदानही करण्यात आले.

ऐतिहासिक विजयपूरमध्ये दोन दिवस आनंदाच्या वातावरणात साइबाबा मूर्ती प्रतिष्ठापना आणि मंदीर लोकार्पण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भक्तांनी धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन आनंदाची भावना अनुभवली.

Tags: