Belagavi

ड्युटी बदलल्यामुळे एका कॉन्स्टेबलचा पोलीस ठाण्यातच अत्म्हत्येचा हायड्रामा

Share

ड्युटी बदलल्यामुळे एका कॉन्स्टेबलने ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बेळगावातील उद्यमबाग पोलीस ठाण्यात घडली आहे.

मुदकप्पा उदगट्टी हे गेल्या दोन महिन्यांपासून गस्ती विभागात कार्यरत होते. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कर्तव्यावर असलेल्या मुदकप्पा उदगट्टी यांना आज बंदोबस्ताची ड्युटी लावल्याने , त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला .

पोलीस ठाण्यात आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ मुदकप्पा यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याने कोणत्याही प्रकारचे विषारी पदार्थ प्राशन केले नसल्याचे सिद्ध झाले आहे. कॉन्स्टेबलला तात्काळ डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले.

Tags: