Belagavi

अखेर अनगोळ येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त मिळाला

Share

बेळगावच्या अनगोळ मुख्य रस्त्यावरील चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवरणाचा मुहूर्त अखेर जुळून आला असून नव्या वर्षात ५ जानेवारी रोजी अनावरण कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज बेळगावच्या महापौर आणि उपमहापौर यांनी पाहणी केली.

अनगोळ मुख्य रस्त्यावरील चौकात बसविण्यात आलेल्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आणि कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनाचा दिवस उजाडला आहे. ५ जानेवारीला पुतळा अनावरणाचा कार्यक्रम होणार असून आज बेळगावच्या महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी तयारीचा आढावा घेतला.

यावेळी महापौर सविता कांबळे यांनी बेळगावातील जनतेने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.  रविवार, ५ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मोठ्या पुतळ्याचे अनावरण आणि कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे उपमहापौर आनंद चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी नगर सेवक व पालिका कमर्चारी उपस्थित होते.

Tags: