सीमावर्ती जिल्हा असणाऱ्या बेळगावमध्ये होणाऱ्या प्रत्येक सण-उत्सवाला वेगळेपण असते. सणांच्या दिवशी लागणारी सर्व सामुग्री खरेदी करणे नित्याचा भाग असते. मात्र, दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ओल्डमॅनची खरेदीही केली जाते. बेळगावमध्ये ओल्डमॅन साठी विशेष बाजारपेठ असून यासंदर्भातील हा विशेष रिपोर्ट :

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान सरत्या वर्षाच्या नकारात्मक घटना आणि क्लेश यांचा ओल्डमॅन दहन करून नष्ट करीत नवीन संकल्पनांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात केली जाते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लहानांपासून तर तरुणाईदेखील ओल्डमॅन तयार करण्यात व्यस्त असते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि शहरांच्या जीवनशैलीत याला थोडासा वेळ मिळणे कठीण आहे. त्यामुळे स्मार्ट युगातही ओल्डमॅनला ऑर्डर देऊन तयार केले जाते.
बेळगावच्या कॅम्प परिसरात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये ओल्डमॅन बाजारपेठ सुरू होते. येथे 10, 11 आणि 15 फूट पर्यंतचे ओल्डमॅन तयार केले जातात. बेळगावातील विविध जिल्हे, महाराष्ट्र, गोवा यासह अन्य राज्यांमधूनही ऑर्डर दिली जाते. रुपये एक हजार ते दहा हजारांपर्यंतचे ओल्डमॅन येथे उपलब्ध होतात.

ओल्डमॅन निर्माता नायिन मोरे यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या आजोबांच्या काळापासून हा व्यवसाय सुरू केला असून, तिसऱ्या पिढीनेही ओल्डमॅन तयार करून विक्रीत उतरला आहे. ट्रेडिंगविषयीचे खास ओल्डमॅन अधिक मागणीत असतात, असे ते म्हणाले. सर्वसामान्यपणे बेळगावमध्ये विविध वस्तूंची बाजारपेठ असतेच, मात्र ओल्डमॅनची बाजारपेठ खास वेगळीच आहे, हे यावरून दिसून येते.


Recent Comments