श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिद्धलिंग स्वामींना संरक्षण द्यावे तसेच त्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना अटक करावी. याशिवाय, या षड्यंत्राचा मास्टरमाईंड मंत्री प्रियांक खर्गे यांच्या पी.ए.चा समावेश असल्याचे सांगून प्रियांका खर्गे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी श्रीराम सेनेने केली आहे.
श्रीराम सेना कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यामध्ये श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्री सिद्धलिंग स्वामींना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींना अटक करून मंत्री प्रियांक खर्गे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यातील करुणेश्वर मठाचे पूज्य सिद्धलिंग स्वामी यांची हत्या करण्याचा कट असल्याचे अलीकडेच आत्महत्या केलेल्या एका कंत्राटदाराच्या मृत्युपत्रात नमूद आहे. मंत्री प्रियांक खर्गे यांचे निकटवर्तीय राजू नावाच्या व्यक्तीने या हत्येचे नियोजन केल्याचेही त्यात लिहिले आहे. त्यामुळे स्वामींना संरक्षण द्यावे, हत्येचा कट रचणाऱ्यांना अटक करावी, आणि प्रियांक खर्गे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी यांनी दिला आहे.
या आंदोलनात श्रीराम सेनेचे बेळगावचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments