बेळगावातील ख्रिश्चनांनी नाताळ सणानिमित्त प्रभु येशूचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
येशूच्या वाढदिवसाची पार्श्वभूमी बेळगावातील ख्रिश्चनांनी 24 डिसेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ख्रिसमस साजरा करण्यास सुरुवात केली. बेळगाव शहर व परिसरातील चर्चमध्ये मध्यरात्रीपासून प्रार्थना सुरू झाल्या.

बेळगाव येथील ऐतिहासिक फातिमा कॅथेड्रल चर्च, सेंट अँथनी चर्च, सेंट मेरी चर्च आदी ठिकाणी धार्मिक सोहळे पार पडले. शहरातील मेथोडिस्ट चर्चमध्ये आज सकाळी धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय शांताप्पा अंकलगी आणि मेथोडिस्ट सोसायटीचे अध्यक्ष मधुकर उत्तंगी यांनी जागतिक शांती, आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

यावेळी बेळगावचे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी व बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी मेथोडिस्ट चर्चला भेट देऊन ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

नाताळच्या पार्श्वभूमीवर शहरातील व परिसरातील चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई , येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या देखाव्यांची सजवण्यात आले होते.


Recent Comments