Belagavi

काहेरच्या वतीने जागतिक ध्यान दिवस साजरा…

Share

बेळगावच्या काहेरच्या काउन्सलिंग सेल आणि सायकॉलॉजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आला.

योग प्रशिक्षक आरती पडसलगी यांनी ध्यानामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्याबद्दल जागरूकता निर्माण केली. त्यांनी ध्यानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानाचे फायदे स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. नंदकुमार, १५० कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. काउन्सलिंग सेल आणि सायकॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. यास्मिन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शिरले नडकिनमणी आणि रम्या यल्लटी यांनी समारोप केला.

Tags: