Belagavi

नामदेव दैवकी समाजाचे मंत्री जारकीहोळी आणि हेब्बाळकर यांना निवेदन

Share

बेळगावातील नामदेव दैवकी समाजाने समाजभवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात मंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन देण्यात आले असून, मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

बेळगावातील नामदेव दैवकी समाजाने समाजभवन बांधण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासाठी आज नामदेव दैवकी समाजाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या घरी भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला.

महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही याच मागणीचे निवेदन देण्यात आले. मंत्री हेब्बाळकर यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

यासंदर्भात माहिती देताना समाजाचे प्रमुख अजीत कोकणे यांनी सांगितले की, बेळगावात नामदेव दैवकी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. समाजाच्या उपक्रमांसाठी सुटसुटीत आणि सुसज्ज अशा समाजभवनाची नितांत गरज भासत आहे. या उद्देशाने मंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

यावेळी समाजाचे उपाध्यक्ष निरंजन बोंगाळे, संचालक दीपक खटावकर, सुरेश पिसे, अशोक रेळेकर, भावू मुसळे, राजन काकडे, नागेश हावळ, महेश खटावकर, मनोज पतंगे, उमेश पिसे, राजू माळवडे, उज्वल बोंगाळे, पुंडलिक वंडकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते.

Tags: