धारवाड ते मनगुंडी गावाला जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे रोज धारवाड ते मनगुंडी या ठिकाणी ये-जा करणारे वेगळ्या गावांतील नागरिक, आणि विशेषतः बेळेगट्टी गावातील लोकं जीव मुठीत धरून रस्त्यावरून जात आहेत.
धारवाड जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री संतोष लाड यांच्या विधानसभा क्षेत्रातील मनगुंडी गावातील लोकं रोजच्या जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत . दरवर्षी हा रस्ता खराब होतो . नव्याने केलेला रस्ता वर्षभरातच पुन्हा खराब होतो. सध्याची अवस्था अशी आहे की, रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे . या रस्त्यावरून दुचाकी चालवण्यासारखी देखील परिस्थिती राहिलेली नाही .

दर सहा महिन्यांनी माती आणि खडी टाकून रस्ते काढले जातात. परंतु, येथे योग्य रस्ता बनवण्यात आलेला नाही, असे गावकऱ्यांचे आरोप आहेत. आता जो रस्ता बनवला जातो तो नंतर आणखी खराब होतो. सध्या हा रस्ता नागरिकांसाठी नरक बनला आहे. आता धारवाड जिल्ह्याचे मंत्री संतोष लाड यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.


Recent Comments