बेळगाव तालुक्यापासून जवळच असलेल्या व पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंसगड किल्ल्यावरती आज शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर 2024 रोजी फ्रेंच देशांमधून आलेल्या पर्यटकांनी राजहंसगडची सफर केली.
गडावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह श्री सिद्धेश्वर मंदिरातही भ्रमंती केली, त्यानंतर गडावरील पुरातन पाण्याची विहीर, तटबंदी बुरुज, व भुयारी मार्गातून अवघड पायऱ्या मधून उतरून किल्ले राजहंगडची संपूर्ण गडभ्रमंती केली. त्यानंतर गडावरती उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह या राजहंसगडचे अगदी उत्तम प्रकारे सुशोभीकरणाचे काम करणाऱ्या हलगा येथील बालाजी काँक्रीट या कंपनीचे सहाय्यकही तेथे उपस्थित होते त्यामुळे या सर्वांच्या बरोबर या विदेशी फ्रेंच पाहुण्यांनी हस्तांदोलन करून सर्वांसोबत फोटो घेऊन फ्रेंच पर्यटक मार्गस्थ झाले.

मागील आठवड्यात याच पद्धतीने जवळपास 30 विदेशी ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी राजहंसगडावरती भेट देऊन गड भ्रमंती करून इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आताही त्याच पद्धतीने फ्रेंच पर्यटकांनी इतिहास जाणून घेण्यासह येथील पुरातन वास्तूंसह सुशोभीकरणाचे बारकाईने निरीक्षण केले.
दिवसेंदिवस गडावरती देशातील व विदेशातील वाढती पर्यटकांची उपस्थिती पाहता गडावरती पिण्याच्या पाण्यासह, स्वच्छतागृह, व गाईडलाईन असणे फार गरजेचे बनले आहे.


Recent Comments