Belagavi

बेळगाव – बेंगळूर विमानसेवा सलग सुरू ठेवा : केंद्रीय मंत्री किजारपुरम मोहन नायडू यांना आवाहन

Share

बेळगाव ते बेंगळुरू दरम्यान सतत विमानसेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन बेळगावचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी , केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि आमदार अभय पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारपुरम मोहन नायडू यांना दिले.

राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी , केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि आमदार अभय पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारपुरम मोहन नायडू यांची भेट घेऊन बेळगाव ते बंगळुरू दरम्यान सतत विमानसेवा सुरू करण्याचे निवेदन सादर केले. यावेळी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार अरविंद बेल्लद , माजी आमदार महांतेश दोड्डगौडा, माजी आमदार व्ही.आय. पाटील आदींचा समावेश आहे.

Tags: