बेळगावच्या हिंडलगा कारागृहात , जन्मठेप झालेल्या कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला . या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तो बेळगाव हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. बेल्लारी येथील गिरीश नावाच्या कैद्याने आत्महत्या केली आहे. कैदी गिरीश कोठडीत गळफास घेत असल्याचे सहकारी कैद्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तत्काळ कारागृह अधिकाऱ्यांना माहिती दिली.
गिरीशला रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले . मात्र उपचार यशस्वी न झाल्याने आज कैदी गिरीशने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.
Recent Comments