Belagavi

बेळगाव शहर व जिल्हा पोलिसांनी केले शस्त्र व वाहन पूजन…

Share

बेळगाव शहर व जिल्हा पोलीस विभागातर्फे आयुध पूजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले.

हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक, नवरात्रीचे स्वतःचे महत्त्व आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी आयुध पूजा करण्याची हिंदू धर्माची प्राचीन काळापासून परंपरा आहे. विविध व्यावसायिकांची त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या साधनांची पूजा करण्याची प्रथा आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव जिल्हा पोलिसांच्या वतीने शहरातील मुख्यालयात शस्त्र व वाहनांचे पूजन करण्यात आले. आयजीपी विकास कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद , अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रुती व डी.ए.आर. एसपी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयुध पूजन करण्यात आले.

शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आयुध पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, डीसीपी रोहन जगदीश, सीएआर एसपी सिद्धन गौडा पाटील, एसीपी सदाशिव कट्टीमणी आणि अन्य अधिकाऱ्यांनी शस्त्रे व वाहनांचे पूजन केले.

Tags: