Belagavi

बेळगावात परतीच्या पावसाने झोडपले: फोर्ट रोडला आले तलावाचे स्वरूप

Share

बेळगावातील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरातील फोर्ट रोडवर मिनी तलाव तयार झाला आहे.

बेळगावात बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सणासुदीत पावसाच्या जोरदार हजेरीने , जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील जिजामाता सर्कल फोर्ट रोडवर सांडपाणी ओव्हरफ्लो झाले असून ते पुढे वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच मिनी तलाव निर्माण झाला आहे . रस्ता ओलांडण्यासाठी वाहनचालक आणि पादचारी आरडाओरड करत असल्याची दृश्ये सर्रास दिसत आहेत .

फोर्ट रोडवरील गटारी तुंबल्याने सांडपाणी दुकानांमध्ये शिरले आहे. या तुंबलेल्या पाण्यातून , वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .

Tags: