Belagavi

ईद मिलाद मिरवणुकीनंतर स्वच्छता मोहीम

Share

बेळगावात ईद मिलाद उत्सव व मिरवणुकीनंतर समाजसेवक गंगाधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले.

बेळगाव शहरात ईद मिलादनंतर समाजसेवक गंगाधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वछता मोहीम राबविण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करण्यासाठी चन्नम्मा सर्कल ते कॉलेजरोडपर्यंत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरचे आमदार आसिफ सेठ, नगर सेवक मुझम्मील डोनी, दिनेश नाशिपुडी, रमेश सोनटक्की, शिवाजीराव मंडोळकर, रियाज किल्लेदार, रिजवान बेपारी उपस्थित होते.

यावेळी गंगाधर पाटील व त्यांचे सहकारी तसेच न्यू स्टार डेव्हलपर्स व मुस्लिम संस्थांचे उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी कौतुक केले. यावेळी गंगाधर पाटील, निखिल अप्पुगोळ, अभिषेक गलगली, दर्शन सिद्धनाईकर, वचन देशनूर, विवेक रामदुर्गे, विकी भैरन्नवरा, श्रीकर शेट्टी आदींचा गौरव करण्यात आला.

Tags: