जन्म देणारे आई-वडील देवासारखे असतात. पण सध्याच्या पिढीतील अंतर आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे संबंध तुटले आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बिघडत चाललेल्या नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी सोमनाथ ते १२ ज्योतिर्लिंग असा पायी प्रवास एका तरुणाने सुरु केला आहे.
खांद्यावर पिशवी…डोळ्यांवर चष्मा. साध्या स्वभावाच्या या माणसाने 12 ज्योतिर्लिंगांची पदयात्रा गेल्या २ वर्षांपासून सुरु ठेवली आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी देवाची उपासना करतो. मात्र, या युवकाचा हेतू हा वेगळाच आहे…
दिनेश भरमा बोरशे असे त्याचे नाव आहे. तो मूळचा धुळे तालुका, खानदेश, महाराष्ट्राचा आहे. 2022 साली शिवरात्री दिवशी सुरु केलेल्या पदयात्रेच्या उद्देश विभक्त कुटुंब पद्धतीत जनजागृती करण्याचा आहे. या युवकाने 12 पैकी 10 ज्योतिर्लिंगांना भेट देईल असून आपल्या पदयात्रेचा उद्देश या युवकाने वेगळा असल्याचे सांगितले आहे.
विभक्त कुटुंब पद्धतीत अलीकडे आई – वडिलांना स्थान दिले जात नसल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. ही प्रकरणे मानवजातीला अपमानास्पद आहेत. ही परंपरा दूर करून नातेसंबंध दृश्य करावेत, या उद्देशाने आपण ही पदयात्रा सुरु केल्याचे या युवकाने सांगितले. तामिळनाडूतील रामेश्वरम येथून आज बेळगावात आलेल्या या युवकाने दररोज 20 ते 60 किमी प्रवास पायी करत ही पदयात्रा सुरु ठेवली आहे. आत बेळगाव ते पुणे आणि तेथून भीमा शंकर असा प्रवास सदर युवक करणार आहे.
हा संकल्प अत्यंत नाविन्यपूर्ण आणि वाखाणण्याजोगा आहे. या युवकाचा हा संकल्प प्रत्येकाच्या आयुष्यात सद्भावना निर्माण करणारा ठरावा आणि वसुधैव कुटुम्बकम ही संकल्पना सार्थकी लागावी, इतकीच अपेक्षा….


Recent Comments