ईश्वरप्पा यांच्या निवासस्थानी कोण कोण भेटले हे मला माहीत नाही. मात्र ईश्वरप्पा यांना पक्षात परत बोलावावे, अशी कोणतीही चर्चा राष्ट्रीय स्तरावर होत नाही. कोणताही प्रयत्न केला जात नाही. राष्ट्रीय नेत्यांनी माहिती मागितली तर ती देऊ, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी व्यक्त केली.
बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना बी.वाय. विजयेंद्र म्हणाले, ईश्वरप्पा यांच्या घरी बसनगौडा यत्नाळ यांच्यासह आणखी कोणते नेते गेले होते याची आपल्याला माहीत नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. पक्षासाठी निवडणूक लढवली नाही.
भाजपमध्ये एकी नाही हे खरे नाही. एकजुटीने पदयात्रा करण्यात आली, ती यशस्वीहि झाली. न्यायालयाने तपासाला परवानगी दिली. उच्च न्यायालयानेही काल मुडा प्रकरणात निकाल दिला. मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे वक्तव्य पाहिले आहे. राजभवनाचा गैरवापर झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा म्हटलं आहे. राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. उच्च न्यायालयाचे आदेश असले तरी ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. तुम्ही उच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर केला पाहिजे. तुमच्या कुटुंबावर आरोप होत असल्याने नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली यावरून मुख्यमंत्रीपदाबाबत विरोधी पक्षात काय सुरु आहे हे लक्षात येते असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप सदस्यत्व मोहिमेत सहभागी होती होण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास देण्यात येत असून विनाकारण कार्यकर्त्याला पोलीस स्थानकात बसवण्यात आले, हे योग्य नाही. आमच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दाणे ही छोटी बाब नाही. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे. अन्यथा पोलीस ठाण्याला घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments