बेळगाव शहरातील ईद-ए-मिलाद मिरवणुक संपवून परतताना रुक्मिणीनगर व उज्वलनगर येथील दोन गटात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारी व तलवार हल्ल्यामध्ये होऊन त्यात चौघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे .
काल शहरामध्ये आयोजित ईद-ए-मिलाद मिरवणूक आटोपून घरी परतणाऱ्या रुक्मिणीनगर व उज्वलनगर येथील युवकांच्या दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.विद्युत दिव्यांच्या नुकसानाच्या मुद्द्यावरून हे भांडण झाले. पुढे या बाचाबाचीचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले.
त्यावेळी एका गटातील युवकांनी तलवारीने दुसऱ्या गटातील युवकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात चौघे जण जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. रविवारी झालेल्या या तलवार हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची नावे मोहम्मद कैफ, साहिल बंडारे, तन्वीर व अहमद अशी आहेत. सदर घटनेनंतर जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे संबंधित भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी माळ मारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणी माला मारुती नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


Recent Comments