Belagavi

कडोली गावातील जवानाचा आजारपणामुळे मृत्यू

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावातील शिपाई तुकाराम शिवाजी पाटील यांचे पुण्यातील लष्करी रुग्णालयात आजारपणामुळे निधन झाले.

बेळगाव तालुक्यातील कडोली गावचे सुपुत्र, महाराष्ट्रातील सिकंदराबाद येथे शिपाई म्हणून कार्यरत असलेले, तुकाराम शिवाजी पाटील यांनी गेल्या २० वर्षांपासून लष्करी सेवेत कार्य बजावले. मात्र आजारपणामुळे निवृत्तीच्या एक महिना अगोदर पुण्यातील लष्करी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह आज कडोली येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: