Banglore

राज्यातील हत्ती आणि वाघांची वाढती संख्या उल्लेखनीय : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

निसर्गाचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाची निसर्गाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. आज राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याच्या पुढाकाराने बलिदान दिन म्हणून पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त आज अरण्य भवन येथील हुतात्मा स्मारकावर मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी अभिवादन केले.

त्यानंतर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राज्यात पुरेसे जंगल नाही त्यामुळे वनीकरण वाढले पाहिजे. “जंगल आणि वन्य प्राणी संपत्तीचे संरक्षण करणे हे केवळ वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे, असे समजून आम्ही आमची जबाबदारी झटकतो,” . राज्यात हत्ती आणि वाघांची संख्या वाढत आहे ही चांगली बाब आहे. परंतु प्राणी-मानव संघर्ष टाळून मानव-प्राणी संपत्तीचे संरक्षण करण्याच्या दिशेने अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. यासाठी उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वन शहीदांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी भरपाई रक्कम ३० वरून ५० लाख करण्यात आली आहे अशी घोषणा केली. जंगलतोडीला अटकाव करण्यासाठी स्वत:चे प्राण पणाला लावणा-यांचा योग्य गौरव आणि स्मरण ठेवण्यासाठी वनसंवर्धन राखणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

या कार्यक्रमास वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.

Tags: