घटप्रभा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कल्लोळी गावात भावांमध्ये झालेल्या भांडणात भावानेच भावाची हत्या केल्याची माहिती एसपी भीमा शंकर गुळेद यांनी दिली आहे. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना एसपी भीमशंकर गुळेद म्हणाले की, गेल्या रविवारी घटप्रभा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कल्लोळी गावात विठ्ठल चव्हाण यांच्यावर हल्ला करण्यात आला. दरम्यान या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत विठ्ठल चव्हाण यांच्या पत्नीने घटप्रभा पोलीस ठाण्यात आपला दीर भीमाप्पा चव्हाण याच्या विरोधात तक्रार दिली आहे. भीमाप्पा चव्हाण यांच्या मुलीचे दुसऱ्या मुलाशी लग्न झाले आहे, हे विठ्ठल चव्हाण आणि भीमाप्पा चव्हाण यांच्यातील नाराजीचे कारण आहे. भीमाप्पा चव्हाण यांची मुलगी गर्भवती असल्याची बातमी गावात पसरली.
आणि हे वृत्त कानावर येताच विठ्ठल चव्हाण आणि भीमाप्पा चव्हाण यांच्यात वाद होऊन टोकाला गेलेल्या वादात हाणामारी झाली. यात विठ्ठल चव्हाण यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत विठ्ठल चव्हाण याचा भाऊ भीमाप्पा चव्हाण याला अटक करण्यात आली आहे.हा सारा प्रकार एका खोट्या बातमीमुळे घडल्याचे स्पष्टीकरण एसपी भीमा शंकर गुळेद यांनी दिले आहे.


Recent Comments