Belagavi

बालविवाह रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

बालविवाह रोखण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास बालविवाह रोखता येईल, असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.  बंगळुरू येथील गृह कार्यालयात विजयनगर जिल्हा भीम संघ, किशोरी संघ, युवा ध्वनी यांचा समावेश असलेली स्वयंसेवी संस्था ‘द कन्सर्न फॉर वर्किंग चिल्ड्रन’च्या सदस्यांशी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

बालविवाह रोखणे हे केवळ आपल्या विभागाचे काम नाही. यात अनेक विभागांचा समावेश होतो. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती, प्रेमविवाह, चित्रपटाचा प्रभाव यामुळेही बालविवाह होतो. बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी किशोरवयीन मुले आणि तरुणांशी संबंधित समस्यांवर सल्लामसलत करण्यात आली. पोषण आहाराचे वाटप व सॅनिटरी पॅडचे वाटप, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अर्ज करताना वडिलांच्या नावाचा उल्लेख अनिवार्य करणे, दारूविक्री, मतिमंद मुलांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली.

यावेळी सहयोगी संचालक कृपा एम.एम., कार्यकारी संचालिका कविता रत्ना, समन्वयक दीप्ती तसेच विजयनगरा स्नेहा फाऊंडेशन, सखी ट्रस्टचे कार्यकर्ते, मंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. टी.एच.विश्वनाथ, महिला व बाल विकास महामंडळाच्या सहसंचालिका अक्कमहादेवी आदी उपस्थित होते.

Tags: