Belagavi

जागामालकांना जमिनी परत द्या : सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांचा मनपाला सल्ला

Share

शहापूर येथील बँक ऑफ इंडिया सर्कलपासून जुन्या पीबी रोडवरील रस्ता रुंदीकरणादरम्यान मनपाने संपादित केलेली जमीन जागामालकांना परत करावी, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी केली आहे.

रस्ते विकासासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेचे प्रकरण मनपाला चांगलेच भोवले असून या प्रकारामुळे बेळगाव महानगरपालिकेला टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. मनपाला १६० नव्हे तर २०० कोटी रुपयांची भरपाई देण्याची वेळ येऊ शकते, असा दावा सुजित मुळगुंद यांनी केला असून आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, कि दक्षिण मतदार संघातील रस्ता रुंदीकरणासाठी नुकसान भरपाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुढील काही प्रकरणांसाठी न्यायालयाने अनामत रक्कम ठेवण्याचेही आदेश दिले असून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे.

बेळगाव मनपाला शहराच्या कारभारासाठी ९ कोटी रुपयांची दरमहा गरज आहे. अशातच नुकसान भरपाई देण्यात मनपाची तिजोरी रिकामी होऊन मनपाला टाळे ठोकण्याची वेळ येणार हे निश्चित आहे. त्यामुळे मनपाने जागामालकांना जमिनीच परत द्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली आहे.

Tags: