Belagavi

मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : मंत्री शिवानंद पाटील

Share

माजी मंत्री आर.व्ही. देशपांडे यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे, हे चुकीचे नाही. मात्र मुख्यमंत्र्यांची खुर्ची सध्या रिकामी नाही असे मंत्री शिवानंद पाटील म्हणाले .

बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री शिवानंद पाटील म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. हायकमांडच्या पातळीवरही अशी चर्चा झाली नाही. माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे, हे चुकीचे नाही. सिद्धरामय्या आणि देशपांडे हे जवळचे मित्र आहेत. मैत्रीची जिव्हाळा असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर कारवाई संदर्भात बोलताना ते म्हणाले कि , कोर्टापुढे मुख्यमंत्री प्रकरणाच्या आधीची अनेक प्रकरणे आहेत. ज्यांनी चूक केली आहे त्यांना आधी शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

एकसंध कर्नाटक आहे, उत्तर-दक्षिण नाही, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिलेला नाही, त्यांनी दिल्लीला जाऊ नका, असे सांगितले नाही . , त्याचवेळी जय मृत्युंजय स्वामीजीना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे ते म्हणाले .

Tags: