Accident

हुबळी येथे कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात – एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Share

हुबळी तालुक्यातील किरेसुर गावाजवळ ओमनी कारचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला.

मृत कोप्पल तालुक्यातील मंगलपुर गावचे रहिवासी आहेत . ते एकाच कुटुंबातील आहेत. जाफरसाब मंगलोर (60), मुस्तफा मंगलोर (36) आणि शोहेब मंगलोर (06) अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेत आणखी तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींना एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हुबळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: