Accident

सरकारी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Share

गदग जिल्ह्यातील नरगुंद तालुक्यातील कोन्नूर गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. कल्लापुर येथील बसवेश्वर मंदिराकडे जाणारी कार आणि इलकलहून हुबळीकडे जाणारी परिवहन बस यांच्यात धडक झाली.

सरकारी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना नरगुंद तालुक्यातील कोन्नूर गावाच्या हद्दीत घडली . या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. गदग जिल्ह्यातील हावेरी येथील रुद्रप्पा अंगडी (५५), पत्नी राजेश्वरी (४५), मुलगी ऐश्वर्या (१६), मुलगा विजय (१२) अशी मृतांची नावे आहेत.

मृत कुटुंब कल्लापूर येथील बसवेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त गेले होते. कल्लापूरकडे जाणारी कार आणि इलकलहून हुबळीकडे जाणारी परिवहन बस यांच्यात भीषण अपघात झाला. धडकेने कारचा चक्काचूर झाला. नरगुंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी नरगुंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: