Belagavi

बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिरात वरमहालक्ष्मी उत्सव

Share

देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या श्री वरमहालक्ष्मी उत्सवानिमित्त आज बसवाण गल्ली, बेळगाव येथील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीची विशेष आरास करून मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

व्हॉइस : बसवाण गल्ली येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सकाळपासूनच लक्ष्मी मूर्तीची आकर्षक आरास करण्यात आली होती. अभिषेक,कुंकुमार्चन विधी आदी धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले. मंदिरात करण्यात आलेली फुलांची विशेष आरास लक्षवेधी ठरली होती. विविध प्रकारची फळे, गोड पदार्थ, खाद्यपदार्थ, दिवे अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. यावेळी महिलावर्गाच्या उपस्थितीत आरती करून वऱयाचना करण्यात आली.

वरमहालक्ष्मी उत्सवाच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना, महिमा कम्मार म्हणाल्या, श्रावण हा हिंदू धर्मातील पवित्र महिना आहे, विशेषत: श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी वरमहालक्ष्मी उत्सव साजरा केला जातो. यादिवशी मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी होते. अभिषेक कुंकुमार्चन, ओटी भरणे असे अनेक धार्मिक कार्यक्रम याठिकाणी साजरे केले जातात. तसेच रात्री मंगल आरती देखील आयोजिण्यात येते, असे त्या म्हणाल्या.

Tags: