बेळगाव शहरातील उषा कॉलनी महालक्ष्मी मंदिर येथे श्रावण शुक्रवारी वरमहलक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले व भाविकांना थेट श्री महालक्ष्मी देवीला महा रुद्राभिषेक करण्याची संधी देण्यात आली.
बेळगावच्या उषा कॉलनीतील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात श्रावण शुक्रवार निमित्त विशेष पूजा सोहळा पार पडला. विशेषत: आज वरमहालक्ष्मी उत्सवानिमित्त मंदिराला विविध फुलांनी सजवण्यात आले होते. विशेषत: महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मी देवीच्या भक्तांना महा रुद्राभिषेक आणि पंचामृत अभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली .

महालक्ष्मी मंदिर समितीच्या सदस्यांनी सांगितले की, श्री महालक्ष्मी मंदिरात सलग १५ वर्षांपासून श्रावण शुक्रवारी महा रुद्राभिषेक केला जात आहे . , श्रावण महिन्याच्या निमित्ताने शुक्रवारी पहाटे ५-३० वाजल्यापासून दाम्पत्य कुटुंबासमवेत अभिषेक करतात. श्रावण शुक्रवारनिमित्त मंदिरात महिलांची मोठी गर्दी उसळली होती .


Recent Comments