Belagavi

मराठा लाईट इनफंट्रीतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात

Share

बेळगाव मधील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी ध्वजारोहण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

तत्पूर्वी शहरात मराठा लाईट इन्फन्ट्रीतर्फे सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅलीतून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा लाईट इन्फन्ट्रीचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: