Belagavi

वाघ आणि बिबट्या दिसल्याचा खोट्या बातमीने लोक हैराण

Share

बेळगाव तालुक्यातील कोंडसकोप्पाजवळील यरमळा गावात वाघ आणि बिबट्या दिसल्याची माहिती खोटी असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बेळगाव शहरात बिबट्या, हत्ती व जंगली प्राणी वारंवार दिसून येत असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. आता वाघ आणि बिबट्या दिसल्याचे सांगत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
बेळगावातील कोंडसकोप्पजवळ वाघ आल्याची खोटी अफवा पसरवून वाघाच्या धावपळीचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला होता.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. वाघ वावरत असल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता . मात्र या भागात वाघाचा कोणताही मागमूस सापडला नाही.
वाघ आला असल्याच्या खोट्या अफवा पसरवत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये वरचा भाग वाघाचा आणि पाय बिबट्याचा आहे. एडिट करून ते व्हायरल करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी काळजी करू नये. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल एक रान मांजर दिसले असून तिला पकडून जंगलात सोडण्यात येईल .

Tags: