Belagavi

बेळगाव एसपी कार्यालयात 78 वा स्वातंत्र्यदिन

Share

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीतासह राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांनी 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अतिरिक्त एसपी बसरगी, अतिरिक्त एसपी श्रुती, डीएसपी दोड्डमणी आदी उपस्थित होते.

Tags: