खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडी टोलनाक्याला भेट देऊन पाहणी केली.
खासदार जगदीश शेट्टर यांनी हिरेबागेवाडीला टोलनाका परिसरातील बसवेश्वर सर्कलसह विविध रस्त्यांची पाहणी करून येथील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि बेळगाव-बैलहोंगल मार्गावरून हिरेबागेवाडी येथील रहिवासी देखील जातात. मात्र त्यांना जा ये करण्यासाठी सुरक्षित मार्ग नसल्याचे यावेळी निदर्शनात आले.

या भागातील नागरिक, अंगणवाडीतील मुले, विद्यार्थी, शासकीय रुग्णालयात येणारे नागरिक, पोलीस ठाण्यात येणारे नागरिक, राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी येणाऱ्या वाहतूक समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. घटनास्थळी उपस्थित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत टोलनाक्यावर जाऊन तपासणी केली.


Recent Comments