बेळगाव शहरातील मुख्य रहदारीचे ठिकाण असलेल्या फोर्ट रोड व फुलबाग गल्लीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, पाऊस असो की ऊन असो, या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी नागरिक कचरतात.
बेळगाव शहरातील फोर्ट रोड आणि फुलबाग गल्ली हा परिसर बेळगावचा ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखला जातो, येथे ऑटो स्पेअर पार्ट्स आणि ऑटो दुरुस्तीची कामे अत्यंत कमी दरात केली जातात. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातून ग्राहकांची ये-जा असते. मात्र येथील रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहनधारकांसहित पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .

या रस्त्यांवर खड्डे पडले तर त्यात माती टाकून ते बुजवले जातात, मात्र अतिवृष्टी झाल्यास सर्व माती निघून जाते आणि पुन्हा खड्डे पाण्याने भरले जातात. आता पाऊस थोडा थांबल्याने , उन्हामुळे , या रस्त्यावरील माती आणि धुळीच्या त्रासाला व्यापारी व ग्राहकांना सामोरे जावे लागेल .
निवडणूक आली कि , मते मागायला येणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर दिसत नाहीत. नगरसेवकही अनेकदा येऊन आत्ता प्रश्न सोडवू असे सांगतात, लोकांना शांत करण्याचे काम करतात, पण रस्ता दुरुस्त करत नाहीत. त्यामुळे येथील रस्त्यांवरील खडे बुजवण्याची , आणि रस्ता विकासाची वाट पहावी लागेल.


Recent Comments