77 व्या स्वातंत्र्यदिनाचा एक भाग म्हणून बेळगाव भाजपच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली .
77 व्या स्वातंत्र्य दिनाचा एक भाग म्हणून भाजपतर्फे बेळगावात तिरंगा रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा कार्यक्रमाचे आयोजन करतात. भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी धर्माचा विचार न करता प्रत्येकाने आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन केले. (बाइट)

भाजप नेत्या उज्वला बडवाण्णाचे यांनी सांगितले कि , 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात स्वातंत्र्य दिनाबाबत जनजागृती करण्यासाठी तिरंगा रॅली काढली आहे . 15 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशासाठी शहीद झालेल्यांना भारतातील प्रत्येक नागरिकाने श्रद्धांजली वाहिली पाहिजे.

शहरातील राणी चेन्नम्मा सर्कल येथून निघालेली तिरंगा बाईक रॅली काकतीवेस रोड , रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली मार्गे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कलवर येऊन सांगता झाली. या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते.


Recent Comments