Belagavi

नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी प्रभागातील समस्यांचा घेतला आढावा

Share

बेळगाव शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या व ड्रेनेजच्या समस्यांविरोधात नागरिक त्रस्त असून आज या प्रभागाच्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

बेळगाव महानगरपालिका अखत्यारीतील प्रभाग क्र. 3 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. तसेच ड्रेनेजच्या समस्येमुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत. आज या भागाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी नागरिकांशी चर्चा करून समस्यां जाणून घेतल्या. यावेळी स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. तसेच या भागातील समस्यां तातडीने दूर करून देण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना नगरसेविका ज्योती कडोलकर म्हणाल्या, विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही. निधीच्या कमतरतेमुळे विकासकामे राबविणे शक्य होत नाही. मात्र तरीही प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, लवकरात लवकर येथील समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी बेळगाव महानगरपालिका व एल अँड टी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: