Belagavi

वेळेवर दुकान उघडा आणि रेशन वाटप करा ; अन्न विभागाचे संयुक्त संचालक मल्लिकार्जुन नाईक

Share

नुकतेच पदभार स्वीकारलेले बेळगाव अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संयुक्त संचालक मल्लिकार्जुन नाईक यांनी शहरातील विविध रेशन दुकानांना भेट देऊन पाहणी केली.

त्यांनी बेळगाव सदाशिव नगर येथील रास्त भाव दुकानांना भेटी देऊन पाहणी केली . जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेटी देऊन पाहणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे आणि ज्यांनी इ केवायसी केलेली नाही त्यांनी महिनाभरात करावे. रेशन दुकाने वेळेवर उघडली जावीत आणि लोकांची गैरसोय न होता रेशनचे वाटप करण्यात यावे. तांदूळ घेणारे सरकारी कर्मचारी आहेत का, याची माहिती मागवली आहे. आम्हाला अशी कोणतीही व्यक्ती आढळल्यास आम्ही दंड आकारू आणि कार्ड रद्द करू. ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे ते त्यांना पाहिजे तिथे रेशन घेऊ शकतात. रेशन दुकानदारांनी वेळ न घालवता लोकांना तांदूळ वाटप करावे .

Tags: