बेळगावच्या हिंडलगा कारागृहावर बेळगाव पोलिसांनी आज पहाटे छापा टाकला.
बेळगावच्या हिंडलगा कारागृहात बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, डीसीपी रोहन जगदीश यांच्यासह 220 हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला.

छाप्यादरम्यान तीन चाकू, 10 तंबाखूची पाकिटे, एक सिगारेट आणि हिटरच्या वायरचे छोटे बंडल, इलेक्ट्रिकल स्टोव्ह व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी बीआरपीएसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments