Belagavi

बस्तवाड ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत शासकीय शाळा व अंगणवाडी केंद्रांना साहित्याचे वाटप

Share

बेळगाव तालुक्यातील बस्तवाड ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत , कर्नाटक सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने नव्याने बांधण्यात आलेल्या NRLM शेडचे उदघाटन तसेच शासकीय शाळा व अंगणवाडी केंद्रांना साहित्याचे वाटप करण्यात आले .


शेडचे उदघाटन .महादेवी बलराम पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष मनोहर सन्नाप्पा मुचंडी, अर्जुन ओमन्ना पाटील, , तवनप्पा बडिगेरा रामा मंगेश काकतकर व जोतिबा रामा चौगुले, रामा चौगुले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. , तसेच बस्तवाड कोंडसकोप्प व कमकरट्टी या गावातील शासकीय प्राथमिक कन्नड व मराठी शाळांतील मुलांना खुर्च्या व राउंड टेबलचे वाटप करण्यात आले व सर्व सदस्य, शाळाप्रमुख यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले .


यावेळी शिक्षक, अंगणवाडी, आशा सेविका, महिला स्वयंसहाय्यता संस्थेच्या सदस्य व ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून उद्घाटन व साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वी केला.

Tags: