आज देशभरात नगरपंचमीचा सण साजरा होत आहे. नेहरू नगर येथील नाग देवस्थान मध्ये विशेष पूजा, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . नेहरू नगरमध्ये , नागमंदिरातील नागदेवतेला अभिषेक , पंचामृत अभिषेक, रुद्राभिषेक करण्यात आला . भक्तांनी दूध आणि नारळ अर्पण केला .
नाग पंचमीच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या गर्भगृहाची खास सजावट करण्यात आली होती सकाळपासून मंदिरात नागदेवतेची पूजा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती . यावेळी बोलताना हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले कि गेल्या २४ वर्षांपासून नागपंचमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे . तीन वर्षांपूर्वी नागदेवतेचे मंदिर बांधले आहे . दरवर्षी भक्तांची संख्या वाढत आहे .

तर मंदिरातील पुजाऱ्यानी , नागदेवतेची आराधना केल्याने सर्व प्रकारचे सौख्य , आरोग्य , ऐश्वर्य , तसेच आपल्या सर्व प्रयत्नांना यश येते . नागदेवतेची अनुग्रह झाल्यास सर्व काही प्राप्त होते असे सांगून सर्व जगाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना केली . नागपंचमीनिमित्त महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते . भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन महाप्रसाद ग्रहण केला .


Recent Comments