Belagavi

नावगे अग्नितांडव : मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट

Share

बेळगाव तालुक्यातील नावगे गावातील टिक्सोटेप उत्पादन कारखान्यात रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या घटनास्थळी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन पाहणी केली.  सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुधवारी रात्री उशिरा बेळगावजवळील नावगे गावातील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीला आग लागल्याच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

नावगे गावातील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची माहिती जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बीनीयांग यांनी दिली. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वत: ,या कारखान्यात कोणत्या प्रकारची इन्सुलिन टेप तयार केली जात आहे, याची पाहणी करून कारखान्यातील आगीच्या घटनेतील जखमींचीही माहिती घेतली.

याशिवाय, आंतरराष्ट्रीय इन्सुलिन टेप मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीच्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेल्या यल्लाप्पा गुंड्यागोळ (२०) या मयत कामगाराच्या आणि आग दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना कुटुंबीयांना शासनाकडून नुकसान भरपाईचे वाटप करण्याचे निर्देशही उपस्थित जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना दिले. .
फ्लो

यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मलागौडा पाटील उपस्थित होते.

Tags: