Belagavi

मातीपासून नागमूर्ती बनवण्याची परंपरा अजूनही टिकून

Share

बेळगाव शहर परिसरातील गावोगावी नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते . गावातील सुतार , लोहार बांधवांच्या घरी मातीच्या नाग मूर्ती बनवल्या जातात . गावातील लोक तांदूळ देऊन ह्या नागमूर्ती आपल्या घरी घेऊन जाऊन त्याची पूजा करतात .

श्रावण महिन्यातील सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी होय . या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते . शहरात तयार नाग मूर्ती विक्रीसाठी येतात . मात्र गावात थोडी वेगळी परंपरा पाळली जाते .

गावातील सुतार व लोहार बंधू शेतातील काळी माती आणून साच्यातून नाग मूर्ती बनवतात . अगदी लहान मुले देखील ह्या मूर्ती करण्यात तरबेज दिसून येतात . मातीपासून साच्यातून मूर्ती तयार करून घरी आलेल्या लोकांना ती मूर्ती देतात . सुतार बंधूंना तांदूळ देऊन लहान मुले नागाची मूर्ती घरी घेऊन जातात अशी आहे परंपरा

आजही बेळगाव तालुक्यातील जुने बेळगाव तसेच हलगा गावातील लोहार बंधूंच्या घरी अजूनही सुरु आहे .   नागपंचमी निमित्त गावागावात घराघरातून झोपाळे बांधले जातात . श्रावणाच्या सुरुवातीला आनंद घेऊन येणारा सण म्हणजे नागपंचमी होय . प्रत्येक घरात थंबिट लाडू , लाह्या असे खाद्य खाद्यपदार्थ बनवले जातात अशी परंपरा आहे .

जुने बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिवनगेकर यांनी या नागपंचमी सणानिमित्त माहिती दिली .  एकंदर अजूनही अनेक गावांमध्ये पारंपरिक रित्या सण साजरे केले जात आहेत . यामुळेच आपल्या देशातील रूढी , परंपरा अजूनही टिकून आहेत .

Tags: