Belagavi

रघुनाथ देसाई यांचे निधन : नेत्र आणि चर्मदान करून मृत्यूनंतरही राहणार स्मरणात

Share

अवयवदान, नेत्रदान, त्वचादान यामुळे एखाद्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या कुणाचाही जीव वाचविता येऊ शकतो. अलीकडे याबाबत जागृती वाढत असून इंडिया मोटर्सचे मालक रघुनाथ कुस्त देसाई यांच्या निधनांनंतर त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार नेत्र आणि चर्मदान करण्यात आले.

भाग्यनगर तिसरा क्रॉस येथील रहिवासी, इंडिया मोटर्सचे मालक रघुनाथ कुस्त देसाई (वय ८६) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्ट आणि केएलईच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाला नेत्रदान आणि चर्मदान करण्यात आले. डॉ. महांतेश रामण्णावर यांनी देसाई कुटुंबीयांची कृतज्ञता व्यक्त केली.

Tags: