प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती द्यावी या मागणीसाठी राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

बेळगाव प्राथमिक शाळा शिक्षक संघाने विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी शहरात ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन दिले.
2017 च्या नवीन संवर्ग संख्याबळामुळे राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. बीएडची पात्रता असूनही सहावी ते आठवीपर्यंत शिकवण्यासाठी या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून ग्राह्य धरले जात नाही. राज्य सरकारने हा अन्याय दूर करून त्यांना गुणवत्ता व सेवाज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.



Recent Comments